Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहिण योजना

Majhi Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकार ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकार ने १ जुलै २०२४ ला सुरू केली.‌ यासारखीच योजना मध्यप्रदेश मध्ये देखील चालू आहे. या योजनेचा उद्देश गरीब महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये देण्यात येणार आहेत.या योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारेल व महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होईल. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहायता मिळेल. त्याद्वारे महिला त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करु शकतील. माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी आमची ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

ladki Bahin Yojana

Table of Contents

माझी लाडकी बहीण योजना काय आहे ?

माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेद्वारे गरीब महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. २१ ते ६५ वयापर्यंत च्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महिलांना आर्थिक मदत करुन त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी व त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. १९ ऑगस्ट २०२४ म्हणजेच रक्षाबंधनला महिलांच्या खात्यात या योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळुन ३००० रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Overview

योजने चे नाव माझी लाडकी बहीण योजना
फायदा दर महिन्याला १५०० रुपये
कोणी सुरू केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन,ऑफलाइन
अर्ज कधी सुरू झाले १ जुलै २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४
अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in/

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश –

महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. आर्थिक मदत मिळाल्याने महिलांचे जीवनमान सुधारेल व त्या आत्मनिर्भर होतील. राज्यात खुप महिला अशा आहेत की ज्या गरिबीमुळे आपल्या गरजा पूर्ण करु शकत नाहीत. या गोष्टी कडे लक्ष देऊन महाराष्ट्र सरकार ने या योजनेची सुरुवात केली. या योजनेमुळे जी आर्थिक सहायता मिळेल त्याद्वारे महिला त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करु शकतील.

माझी लाडकी बहीण योजना पात्रता –

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे ही पात्रता असणे गरजेचे आहे –

  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटीत महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
  • ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नाही त्या या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
  • २१ ते ६५ वयापर्यंत च्या महिला या योजनेसाठी अर्ज करु शकतात.
  • जर घरातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरी मध्ये असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेसाठी अर्ज करु शकत नाही.

Mazi Ladki Bahin Yojana आवश्यक कागदपत्रे –

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना साठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या कडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे –

  • अर्जदार महिलेचा आधारकार्ड
  • मूल निवास प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • रेशनकार्ड
  • बॅंक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • मोबाईल नंबर

माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा भरावा?-

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा फाॅर्म भरायचा असेल तर तुम्हाला या स्टेप्स फाॅलो कराव्या लागतील –

  • माझी लाडकी बहीण योजनेचा फाॅर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर जाऊन नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करावा लागेल.
माझी लाडकी बहिण योजना
  • आता ॲप उघडल्यावर तुमच्या समोर लाॅगिन पेज येईल. यात तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता ओटीपी टाकायचा आहे आणि टर्म व कंडीशन वर क्लिक करायचे आहे व लाॅगिन करायचे आहे.
mazi ladki bahin yojana maharastra
  • आता तुमच्या स्क्रीन वर प्रोफाईल अपडेट हा पर्याय आला असेल. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका, नारीशक्ती चा प्रकार या सर्व गोष्टी भरायच्या आहेत.
  • आता तुम्हाला नारीशक्ती दूत या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला एप्लिकेशन ला लोकेशन ची परमिशन द्यायची आहे.
majhi ladki bahin yojana
  • आता तुमच्या समोर लाडकी बहीण योजनेचा फाॅर्म येईल. हा फाॅर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे.
  • तुमच्या आधारकार्ड वर जी माहिती असेल तीच तुम्हाला इथे टाकायची आहे. तुम्हाला आधारकार्ड वरील तुमचे नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधारकार्ड क्रमांक व तुम्ही इतर शासनाच्या योजनांचा लाभ घेत आहात का ही सर्व माहिती भरायची आहे.
  • जर तुम्ही इतर कोणत्याही शासनाच्या योजनांचा लाभ घेत नसाल तर तुम्हाला नाही या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुम्हाला वैवाहिक स्थिती टाकायची आहे व महिलेच्या लग्नाच्या आधीचे नाव टाकायचे आहे. आता तुम्हाला महिलेचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे की परप्रांतात हे पर्याय निवडायचे आहेत.
  • आता तुम्हाला तुमच्या बॅंक खात्याबद्दल काही माहिती विचारली जाईल. ती तुम्हाला भरायची आहे. यात तुम्हाला बॅंकेचे नाव, अकाउंट नंबर, आयएफसी क्रमांक, आधारकार्ड बॅंक अकाउंट ला लिंक आहे की नाही ही सर्व माहिती भरायची आहे.
  • आता तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यात तुम्हाला आधारकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, अर्जदाराचा हमीपत्र, बॅंक पासबुक, महिलेचा जन्म जर पर प्रांतात झाला असेल तर त्याचा दाखला ही सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
  • आता तुम्हाला अर्जदाराचा फोटो हा एक पर्याय आला असेल. इथे तुम्हाला अर्जदार महिलेचा लाइव्ह फोटो काढून अपलोड करायचा आहे.
majhi ladki bahin yojana online apply
  • आता तुम्हाला “Accept हमीपत्र डिस्क्लेमर” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर या योजनेच्या अटी व शर्ती आल्या असतील. त्या तुम्हाला एक्सेप्ट करायच्या आहेत.
  • आता तुम्ही जी कागदपत्रे अपलोड केली आहेत ती तुम्हाला एकदा तपासून घ्यायची आहेत. आता सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो तुम्हाला टाकायचा आहे. अशा प्रकारे तुमचा माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून झाला आहे.
mukhyamantri majhi ladki bahin yojana

Mazi Ladki Bahin Yojana New Application Portal –

१ ऑगस्ट २०२४ ला माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाइट लाॅंच झाली आहे. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या आधिकारिक वेबसाइट वर जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करु शकता. जर तुम्हाला या वेबसाइट वरुन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील –

  • माझी लाडकी बहीण योजने च्या नवीन पोर्टल वरुन अर्ज करण्या साठी तुम्हाला सर्वात आधी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ या आधिकारीक वेबसाइट वर जावे लागेल.
  • आता मेनू मध्ये तुम्हाला लॉगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला Dosen’t have account create account या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमच्या आधारकार्ड वर असलेले नाव, पत्ता, जिल्हा व तालुका ही माहिती टाकायची आहे.
  • आता तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे व महानगरपालिका टाकायची आहे. आता कैपचा टाकून साइन अप या बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला परत वेबसाइट वर लॉगिन करायचे आहे. आता मेनू मध्ये माझी लाडकी बहीण योजना या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर एक पेज येईल. त्या वर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व मोबाइल नंबर वर आलेला otp टाकून वेरिफाय करायचे आहे.
  • आता तुम्हाला तुमचं बँक अकाऊंट नंबर, बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव,ifsc क्रमांक टाकायचे आहे.
  • आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत.
  • आता तुम्हाला अर्ज दाराचा फोटो अपलोड करायचा आहे. आता तुम्हाला Accept Affidavit Disclaimer या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता सबमिट या बटन वर क्लिक करायचे आहे. आशा प्रकारे तुम्ही नवीन पोर्टल वरुन या योजने साठी अर्ज करू शकता.

माझी लाडकी बहीण योजना लाॅगिन प्रक्रिया/ लाॅगिन पोर्टल –

  • माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाॅगिन करण्यासाठी आधी तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचा आहे.
  • आता युजर नेम आणि पासवर्ड टाकून लाॅगिन या बटन वर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुमची नारी शक्ती दूत ॲप वर लाॅगिन प्रक्रिया पुर्ण होईल.

माझी लाडकी बहीण योजना स्टेटस चेक ऑनलाईन –

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्हाला ह्या स्टेप्स फाॅलो कराव्या लागतील –

  • माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी आधी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचा आहे.
  • आता तुम्हाला ॲप वर लाॅगिन करायचे आहे. आता ॲप च्या मेनू मध्ये तुम्हाला योजनांची लिस्ट दिसेल. यात तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना हा पर्याय निवडायचा आहे.
  • आता तुमच्या समोर Status Check हा पर्याय येईल. यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर नवीन पेज येईल. यामध्ये तुम्हाला अर्जाची संख्या टाकायची आहे आणि Status Check या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्या समोर अर्जाची स्थिती येईल.

माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) यादी/Approved list –

  • जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेची लिस्ट चेक करायची आहे तर तुमच्या समोर दोन पर्याय आहेत. तुम्ही नारी शक्ती दूत ॲप वर किंवा नगर निगम किंवा नगरपालिका च्या आधिकारिक वेबसाइट वर जाऊन लिस्ट चेक करु शकता. जर तुम्ही ऑनलाईन फाॅर्म भरला असेल तर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप वर जाऊन लिस्ट चेक करावी लागेल. जर तुम्ही ऑफलाईन फाॅर्म भरला असेल तर तुम्हाला नगर निगम किंवा नगरपालिका च्या आधिकारिक वेबसाइट वर जाऊन लिस्ट चेक करावी लागेल.
  • जर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप वर जाऊन लिस्ट चेक करायची असेल तर तुम्हाला या स्टेप्स फाॅलो कराव्या लागतील –
  • नारी शक्ती दूत ॲप वर जाऊन लिस्ट चेक करायची असेल तर तुम्हाला आधी नारी शक्ती दूत ॲप उघडावे लागेल.‌आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तुम्हाला ओटीपी टाकून लाॅगिन करायचे आहे.
  • आता तुम्हाला खाली “यापूर्वी केलेले अर्ज” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्या समोर तुमचा अर्ज येईल व खाली अर्जाची स्थिती येईल. अशा प्रकारे तुम्ही नारी शक्ती दूत ॲप वर अर्जाची स्थिती चेक करु शकता.

Majhi Ladki Bahin Yojana अर्ज डाउनलोड/ Application Form Download –

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही या लिंक वर क्लिक करुन डाउनलोड करु शकता.

माझी लाडकी बहीण योजना लास्ट डेट –

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायची शेवट ची तारीख १५ जुलै होती. पण आता शेवटची तारीख वाढवून ३१ ऑगस्ट केली गेली आहे.

माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) हमीपत्र –

  • जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचा हमीपत्र डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या आधिकारिक पोर्टल वर जावे लागेल.
  • आता तुम्हाला हमीपत्र डाउनलोड ची लिंक शोधायची आहे.आता हमीपत्र डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे –

  • माझी लाडकी बहीण योजने द्वारे महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • महिलांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील.
  • महिलांचे जीवनमान सुधारेल व त्या आत्मनिर्भर होतील.

माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) Customer Care Number/ Helpline Number –

जर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणती समस्या येत असेल किंवा या योजनेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या कस्टमर केअर नंबर/ हेल्पलाईन नंबर वर संपर्क करु शकता –

  • माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर :- 181
  • महिला व बाल विकास विभाग हेल्पलाइन नंबर :- 022-22027050

FAQs

  1. माझी लाडकी बहीण योजना काय आहे ?

    Ans – महाराष्ट्र सरकार ने माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकार ने १ जुलै २०२४ ला सुरू केली.‌ या योजनेचा उद्देश गरीब महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये देण्यात येणार आहेत.

  2. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल ची लिंक कोणती आहे ?

    Ans – https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल ची लिंक आहे.

  3. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?

    Ans – माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा २१ ते ६५ वर्षे आहे.

  4. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

    माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे

निष्कर्ष –

या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना काय आहे, माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश, माझी लाडकी बहीण योजनेचे फायदे, माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पीडीएफ फाॅर्म कसा डाउनलोड करायचा, हमीपत्र डाउनलोड कसा करायचा याबाबत माहिती दिली आहे. जर तुम्हाला आमची ही पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद!

Scroll to Top